निरवडे श्रावणमास भजन स्पर्धेत विठ्ठल रखुमाई भजन मंडळ प्रथम..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 05, 2023 11:54 AM
views 65  views

सावंतावडी : निरवडे येथील श्रीदेव भूतनाथ कलाक्रिडा मंडळातर्फे श्रावणमास भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विठ्ठल रखुमाई भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गोठण भजन मंडळ वजराट तृतीय क्रमांक स्वरसाधना संगीत भजन मंडळ कडावल तर उत्तेजनार्थ कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये यांनी मिळविला.

उर्वरित निकाल उकृष्ट गायक - अर्थव होडावडेकर,उकृष्ट पखवाज - तुषार नागडे,उकृष्ट हार्मोनियम -काशिनाथ परब,उकृष्ट तबला - समिर धुरी,उकृष्ट कोरस - विठ्ठल रखुमाई भजन मंडळ,आंदुर्ले,उकृष्ट झांज -भावेश परब,शिस्तबद्ध संघ श्री देवी सातेरी भजन मंडळ मांतोड यांनी मिळविला.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्ञानदेव मेस्री व मनिष तांबोस्कर काम पाहिले.तर सूत्रसंचालन संदिप दळवी यांनी केले.