
सावंतवाडी : आषाढी वारीचे औचित्य साधून कळसुलकर शाळेच्या आनंद शिशुवाटिकेने आपल्या सर्व विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी गुरुवार दि. ३ जुलै रोजी आयोजित केली होती.
ही छोट्या वारकऱ्यांची दिंडी सावंतवाडीच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात पोहोचली. डोक्यावर तुळशी आणि हाती भगव्या पताका टाळ घेऊन हे छोटे वारकरी श्री विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले. विद्यार्थी वर्गासमवेत शिशुवाटिकेच्या शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग सुद्धा तल्लीन होऊन अभंग गायन करताना दिसला. आनंद शिशुवाटिकेच्या या उपक्रमाचे श्री विठ्ठल मंदिर सावंतवाडीच्या वतीने कौतुक करण्यात आले.