
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक श्रीम आर विमला यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन समग्र शिक्षा अभियान राज्य कार्यालय अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाना भेटी देत आढावा घेतला. या भेटी दरम्यान त्यांनी समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर निवासी शाळांच्या सासोली दोडामार्ग , सावंतवाडी भटवाडी, व वेंगुर्ला येथील जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ गणपती कमळकर शिक्षणाधिकारी प्राथमिक, श्री शोभराज शेरलेकर, श्री प्रजापती थोरात, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक , श्रीमती कल्पना बोडके गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी, श्रीम स्मिता नलावडे कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा सिंधुदुर्ग सुशांत रणदिवे समन्वयक, लक्ष्मण सावंत कनिष्ठ अभियंता हे उपस्थित होते. यावेळी आर विमला यांनी विविध योजनाचा परिपूर्ण आढावा घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळांच्या कामाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त करत विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
जिल्हा परिषदेच्या सासोली नं १, प्रधानमंत्री रायझिंग इंडिया स्कूल बादा नंबर १, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा pm श्री शाळा चराठे नं.१ या शाळांना भेटी दिल्या. शाळेतील समग्र शिक्षा अतंर्गत साहित्य पेट्या वापर ,आनंददायी शनिवार ,महावाचन चळवळ ,विज्ञान प्रयोगशाळा ,अटल टी करिंग लॅब इंग्लीश मराठी गणित किट ,जादुई पिटारा पी.एम.श्री.शाळेअंतर्गत राबवलेल्या विविध योजना यांचा परिपूर्ण आढावा तसेच स्टार प्रकल्प व समग्र शिक्षा मधील विविध उपक्रम याविषयी पाहणी केली. शिक्षणाधिकारी श्री कमळकर यांनीही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे उत्तम कामाबद्दल अभिनंदन केले.
त्यानंतर नाथ पै शिक्षण संस्था सभागृह कुडाळ येथे शिक्षण विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी डाऐट मधील प्राचार्य अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी प्राथमिक व योजना सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,समग्र शिक्षा लेखाधिकारी, स लेखाधिकारी डाटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ सहाय्यक, विषय तज्ञ, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, MIS कोर्डीनेटर यांची PM श्री योजना, स्टार प्रकल्प, व समग्र शिक्षा योजनेबद्दल आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले,तसेच काम करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या, त्यावर मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.