युवा सेनेची ग्रामीण रुग्णालयाला भेट | कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 13, 2023 13:32 PM
views 316  views

वैभववाडी : तालुक्यातील आरोग्य विभागाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.यावेळी कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला.रुग्णालयात असलेल्या समस्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.

नाईक यांनी आढावा घेत असताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की,रुग्णालयात शौचालयांना कड्या नाहीत,कफ सिरप उपलब्ध नाही,पगार वेळेवर होत नाही,रक्त तपासणीची अद्यावत मशनरी आहे परंतू आर्थिंग व्यवस्था नसल्याने ती मशीन धूळ खात आहे.कर्मचारी वर्गाच्या रिक्त जागा भरल्या नाहीत.अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या.याबाबत आपण आवाज उठवू असं नाईक यांनी सांगितले.यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, सरपंच विलास नावळे, जितेंद्र तळेकर, सुनिल कांबळे, नगरसेवक मनोज सावंत, सुनील रावराणे, रोहीत पावसकर,अतुल सरवटे, गणेश पवार,नितेश शेलार,यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .