
देवगड : प्रसिद्ध लेखिका इन्फोसिस कंपनीच्या माजी अध्यक्ष पद्मश्री सुधा मूर्ती यांनी मंगळवारी सायंकाळी विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली . मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी त्यांना विजयदुर्ग किल्लाची खूप उत्तम प्रकारे समजावून सांगितली. मराठा आरमाराचे प्रतीक असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची सध्या होत असलेली पडझड पाहता या किल्ल्याला भेट देणारी पर्यटक मंडळीत नाराजी दिसते. मात्र प्रसिद्ध लेखिका असलेल्या पद्मश्री सुधा मूर्ती यांनी जवळपास तीन साडेतीन तास किल्ला फिरून विजयदुर्ग किल्ल्याची सर्व माहिती जाणून घेतली. किल्ला पाहता पाहता कधी काळोख झाला हे देखील समजले नाही. मंगळवारी सायंकाळी चार ते साडेसात वाजेपर्यंत त्यांनी विजयदुर्ग किल्ल्या परिसराची पूर्ण पहाणी करत समाधान व्यक्त केले. मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर आडके यांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या सन्मानही करण्यात आला। यावेळी विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच प्रसाद देवधर उपस्थित होते.