सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट...!

Edited by:
Published on: January 05, 2024 13:22 PM
views 256  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी भेट देत नव्यानं उभारण्यात येणाऱ्या आयसीयु व सिटीस्कॅन युनिटच्या कामाची पहाणी केली. यासंदर्भातील आढावा वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडून घेतला.

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत आयसीयु युनिट व सिटीस्कॅन मशीन बसण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे‌. गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी या कामाची पहाणी करत आढावा घेतला. यावेळी संबंधितांना त्यांनी काही सुचना देखील केल्या. तर उप जिल्हा रूग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेत काही सुचना रूग्णालय स्टाफला दिल्या.  यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, वैद्यकीय अधिक्षक ज्ञानेश्वर ऐवळे, अमित जगताप, कार्यालयीन अधिक्षक येळेकर, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. मुरली चव्हाण, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. संदीप सावंत, डॉ. लादे, डॉ. सागर जाधव, सिद्धार्थ जाधव, श्री.सडेकर तसेच डॉक्टर व परिचारिका आदी उपस्थित होते.