जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांची देवगड ग्रामीण रुग्णालयाला भेट

नितेश राणेंनी दिली होती सूचना
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2023 18:35 PM
views 156  views

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्टाफ आता उपलब्ध झाला असून उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या समवेत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी आज देवगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट दिली. रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री औषधे रुग्णसेवा व स्टाफ याचा पूर्णतः आढावा घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटकर यांना समज कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वसूचना दिल्याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विटकर यांनी आपले कार्यक्षेत्र सोडू नये अशा शब्दात देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटकर यांना समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास नोटीस बजावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन M.B.B.S अधिकारी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य योजनेतून डॉक्टर संजय विटकर व डॉक्टर अर्चना राजपूत या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असल्याचे श्रीपाद पाटील यांनी सांगितले. देवगड रुग्णालयामध्ये सर्वात जास्त गरज गरोदर मातांना सेवा देणे ही आहे.  यामुळे हे पद स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉक्टर रघुनाथ जोशी यांच्याकडे आहे. तसेच डॉक्टर अर्चना राजपूत या देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. याशिवाय होमिओपॅथी व आयुर्वेदिक मधील वैद्यकीय तज्ञ देवगड ग्रामीण रुग्णालयात असून कोणत्याही प्रकारे सेवा कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली जात आहे. शासनाकडे या रिक्त पदाबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी ही भरली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देवगडच्या रुग्णसेवेवर आमदार नितेश राणे यांनी लक्ष दिले आहे. यामुळे यापूर्वीच रिक्त असलेल्या चार अधीपरिचारिकाच्या जागा यापूर्वीच भरलेल्या आहेत. तसेच उर्वरित जागांसाठी आमदार नितेश राणे हे पाठपुरावा करत आहेत.