फुटबॉल स्पर्धेत स्थानिक खेळाडू उतरले पाहिजेत हे व्हिजन : संदीप गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2024 15:46 PM
views 87  views

सावंतवाडी : फुटबॉल स्पर्धेत स्थानिक खेळाडू उतरले पाहिजेत हे आमचे व्हिजन असून या शिबिराची सुरुवात केली आहे. मनापासून साथ दिली तर एक चांगला संघ बनवू असा विश्वास भाजप माजी तालुकाध्यक्ष संदीप एकनाथ गावडे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आयोजीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस कर्मचारी राजा राणे, गेळे सरपंच सागर ढोकरे, अनिकेत आसोलकर, प्रशिक्षक गिलबर्ड टिकोस्टा, प्रशिक्षक एलपीलो पिंटो, सिद्धेश सावंत, भुवन नाईक,नारायण पेंडूरकर, अभिषेक लाखे, किसन धोत्रे, रोशन पेंडणेकर आदी उपस्थीत होते. 

युवा नेते संदीप एकनाथ गावडे आयोजित मोफत फुटबॉल प्रशिक्षण आणि जिल्हास्तरीय निवड चाचणीचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेल्या वर्षी फुटबॉलची घेतलेली स्पर्धा सुपरहिट स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमधला थरार बघितला तर प्रीमियम फुटबॉल सिरीज सारखा प्रवास होता. एक दुःख मनामध्ये होतं की सावंतवाडीचा फुटबॉलचा क्लब नाहीये आणि आमचे फुटबॉलचे स्वतःचे प्लेयर नाही आहेत. मग आम्ही गेल्या वेळी ठरवल की सावंतवाडीचा फुटबॉल क्लब लॉन्च करायचा आणि त्याच स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हा क्लब लॉन्च केला. हे शिबिर आपण घेतोय ते आज साठी नाही आहे तर भविष्यासाठी आहे. 21 ते 30 हा कालावधी जरी असला तरीपण तिथून पुढे सुद्धा आम्ही तुमचा हात कधी सोडणार नाही. तुमच्यापैकी ज्याला ज्याला वाटतं की मी फुटबॉल खेळाला आपलंसं करू शकतो त्यांच्यासोबत एफसी फुटबॉल क्लब पूर्णपणे सोबत राहील. यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत एफसी सावंतवाडीचा संघ तयार व्हावा असा आमचा मानस आहे. जेणेकरून सावंतवाडीचा स्वतःचा संघ येथे खेळेल. तुम्ही मनापासून जर साथ दिली तर एक चांगला संघ आपण बनवू. 

यापूर्वी येथे मोठ्या स्थरावर फुटबॉलची स्पर्धा घेण्याची आली नव्हती मात्र आम्ही घेतली. आणि ती सक्सेसफुलही झाली. याही वर्षी त्याच जोशाने आपण उतरणार आहोत.फक्त बाहेरून खेळाडू आणून टीम नाही बनवायची तर आपले येथील स्थानिक खेळाडू खेळले पाहिजेत. या पद्धतीच व्हिजन घेऊन आम्ही चाललो आहोत. या प्रशिक्षणात टॅलेंट असलेला खेळाडूला १००% स्पोर्ट्स स्कॉलरशिप मिळणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो. फुटबॉल खेळायला स्किल लागतं आणि बॉल लागतो महागडा खेळ तर क्रिकेट आहे. त्यामुळे मेहनत करा आपल्या बाजूला असणारा संघ गोवा त्याला जोरदार टक्कर द्या या पद्धतीची जिद्द ठेवा आणि सुरुवात करा. आजची सुरुवात हा उद्याचा इतिहास असेल.

यावेळी राजा राणे म्हणाले, संदीप गावडे हा जो उपक्रम करत आहेत त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा दिला पाहिजे. फुटबॉल क्षेत्रात ग्रामीण भाग खूप मागे आहे. क्रिकेटच्या लाल बोलणे आम्ही फुटबॉल शिकलो. त्यावेळी परिस्थिती नव्हती. टीव्हीवर कुठेतरी बघायचं आणि फुटबॉल खेळायचो. गावडे सरांनी तुम्हाला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या. तुमच्यापैकी खेळाडू मोठा होऊन तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाव उज्वल करावं अशा शुभेच्छा दिल्या.