
सिंधुदुर्गनगरी : मुंबई विद्यापीठा मार्फत गेल्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या युवा महोत्सवात मुंबईतील तेरणा कॉलेजचा विद्यार्थी विश्वनाथ उर्फ यश आबा मालडकर मिस्टर युनिव्हर्सिटीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे विश्वनाथ हा मूळचा मालवण वायरी भूतनाथ येथील असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे ३९०० विद्यार्थी मधून त्याची निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात संपूर्ण राज्यभरातून एकूण ३९०० विद्यार्थ्यांनी मिस्टर युनिव्हर्सिटी स्पर्धेत भाग घेतला होता
ही स्पर्धा गेली आठ महिने मुंबई विद्यापीठातील हॉलमध्ये सुरू होती या स्पर्धेमध्ये मालवण वायरी भूतनाथचा विद्यार्थी विश्वनाथ आबा मालडकर हा नवी मुंबई येथील तेरणा कॉलेज मध्ये मेकॅनिकल इंजिनियर शिक्षण घेत असताना स्पर्धेत सहभागी झाला होता इंजीनियरिंगचा अभ्यास करून शेवटपर्यंत परिश्रम करून रात्री बारा ते एक वाजता रूमवर येऊन सुद्धा पुन्हा सकाळी कॉलेज असे आठ महिने खडतर प्रवासातून मिस्टर युनिव्हर्सिटीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे
या ट्रॉफीचे वितरण सिने कलाकार तसेच टीव्ही मालिका सीआयडी चे शिवाजी साटम यांच्या हस्ते ताराबाई टॉवरच्या प्रतिकृतीची ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ अजय भामरे, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष संचालक डॉ सुनील पाटील, मुंबई विद्यापीठ कला व सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ निलेश सावे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते विश्वनाथ हा मूळ या स्पर्धेसाठी त्याच्या आई-वडील व बहिणीकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले लहानपणापासून राज्यस्तरीय नॅशनल लेव्हलपर्यंत बास्केटबॉलल बॅडमिंटन एक पात्र प्रयोग नाटक अशा विविध क्षेत्रातून बक्षीस मिळवले. विश्वनाथ हा मूळ मालवणचा रहिवासी असल्याने त्याचे मालवण मध्ये व तेरणा कॉलेजचे विद्यार्थ्यांकडून मालवण मध्ये व तेरणा कॉलेजचे विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे