'विश्वकर्मा कौशल सन्मान योजना' मेळावा ही बारा बलुतेदारांसाठी मोठी उपलब्धी : प्रभाकर सावंत

Edited by:
Published on: October 03, 2023 11:19 AM
views 46  views

सिंधुदुर्ग : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता विश्वकर्मा योजना मेळावा शरद कृषी भवन, ओरोस येथे आयोजित करण्यात येत आहेत. यानिमित्त आ. नितेश राणे, प्रदेश सचिव  निलेश राणे,  राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे उपस्थित राहणार असून आपणास त्यांचे मार्गदर्शन लाभेल. यानिमित्त समाजातील सर्व स्तरातील लोकप्रतिनिधींसह,सर्व समाजातील लोकानी मोठ्या संख्येने सहभागी होत या योजनेंचे मार्गदर्शन घ्यावे.

देशातील १० लक्ष लोकानी एक आठवड्यात लाभार्थी साठी अर्ज दाखल करीत या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विशेषत मा. नारायणराव राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग सुपुत्र शरद मेस्त्री यांना दिल्ली येथे बोलावून मोदीजींच्या हस्ते सन्मानित केले आणी आपल्या जिल्ह्य़ाला देशपटलावर नेण्यात आले हे निश्चित कौतुकास्पद आहे.जिल्ह्यातील कारागिरांना त्यांच्या कलेला निश्चित असा वाव मिळणे ही या योजनेची उपलब्धी आहे.तसेच या  योजनेंतर्गत सुरवातीला रुपये 1 लाख किमान म्हणजे 5 टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध ही सुसंधी आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध जाती -जमातीमधील विश्वकर्मानीं या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ समजून घ्यावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे.