
मंडणगड : भाजपचे माजी मंडणगड तालुका अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे महाराष्ट्र राज्य सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशच्या वरिष्ठ कार्यालयातून नुकतीच या सदस्य पदाकरिता त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विश्वदास लोखंडे यांनी भाजपचे मंडणगड तालुक्याचे तालुका अध्यक्ष पद भूषवले आहे. त्यानंतर पार्टीने त्यांच्यावर जिल्हा स्तरावरील जबाबदारी देवून भाजपचे जिल्हा सरचिटणीस या पदावर त्यांची नियुक्ती केली होती दापोली मतदार संघातील तीनही तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. पक्षवाढीसाठीचे उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीनंतर तालुक्यातून अनेक स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.