
पणजी : विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज गोव्यामध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेत शिवगर्जना ह्या महानाट्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. विशाल परब यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची गोव्यामध्ये ही महत्त्वपूर्ण भेट घेतली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आमंत्रण विशाल परब यांनी मुख्यमंत्र्यांना दिल आहे.विशाल सेवा फाउंडेशन आणि भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17 मार्च रोजी भव्य दिव्य अशा शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याच्या शुभारंभानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे हे आमंत्रण विशाल परब यांनी मुख्यमंत्री यांना दिले आहे.विशाल परब यांचे हे आमंत्रण स्वीकारत आपण या महानाट्यास उपस्थित राहण्यास चा शब्द विशाल परब यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला. यावेळी विशाल परब यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले आहेत.या महानाट्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद सावंत हे उपस्थित राहणार आहेत; याशिवाय भाजपचे अन्य गोव्यातील नेतेही या महानाट्यास उपस्थित राहणार आहेत.