विशाल परब यांचा वाढदिवस आणि दिग्गजांच्या शुभेच्छा..!

Edited by: भरत केसरकर
Published on: October 16, 2023 18:56 PM
views 124  views

सावंतवाडी : विशाल परब तू खरच भाग्यवान आहेस. तुझ्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचं हे पर्व असंच कायम राहू दे अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमातूनच मी मोठा झालो आणि राज्याच्या उद्योग मंत्री पदापर्यंत पोहोचलो तू खरंच चांगलं काम करतो आहेस तुझं हे कार्य असं चालू ठेव अशा शब्दात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

विशाल परब हा एक समाजसेवेच्या रूपाने हिरा मिळाला आहे त्याची साधी राहणीमान आणि परिश्रम कष्ट आणि परिश्रमाच्या आधारावर त्यांनी हे जे काही विश्व निर्माण केले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या 

भाजपचे युवा कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, पत्नी सौ. वेदिका परब, प्रभाकर सासरे रवींद्र परब भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री आंग्रे महीला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,भाजपा उपाध्यक्ष संजू परब, प्रथमेश तेली, रणजित देसाई, गोवा डिचोली मतदार संघाचे आमदार डाॅ.चंद्रकांत शेट्ये,ॲड.संतोष सुर्यराव,दीपक नारकर, नागेश मोर्ये, अजय गोंदावळे सुधीर आडीवरेकर मोहिनी मडगावकर, केतन आजगावक,र चेतन चव्हाण, मोहन सावंत, दादा साई, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी विशाल परब यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व फटाक्यांचे आतीश बाजी करण्यात आली. या अभिष्टचिंतन सोहळ्याला खास प्रसिद्ध सिंगर जुबीन नौटियाल याला पाहण्यासाठी आणि त्याची गाणे ऐकण्यासाठी संपूर्ण जिमखाना मैदान प्रेक्षकांनी तोबा भरून गेले होते.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले मी देखील असाच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमातून मोठा झालो आणि राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचलो तू खरंच भाग्यवान आहेस तुझ्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला केंद्र व राज्यातील मंत्री येथे उपस्थित आहेत विशेष करून तू एक चांगलं काम केलं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांना एकाच व्यासपीठावर आणून आजूबाजूला बसवलं मी माझा वाढदिवस साजरा करतो पण माझ्या वाढदिवसाला असे अनेक नेते यायला भीत होते पण तू खरच या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच हे पर्व तू असंच कायम चालू ठेव तुझ्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असे ते म्हणाले यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले विशाल परब याला मी लहानपणापासून ओळखतो त्याने स्वतःच्या पायावर उभे राहून खूप काही केलं आहे त्याची साधी राहणीमान आणि परिश्रम करण्याची क्षमता त्या जोरावरच तो इथपर्यंत पोहोचला आहे विशाल परब समाजसेवेच्या रूपाने आम्हाला एक हिरा मिळाला आहे तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत यावेळी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी विशाल परब यांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट ये म्हणाले विशाल परब याला सामाजिक भान आहे काहीतरी करायची त्याच्या मनात इच्छा आहे आणि तो चांगलं काम करतो आहे राजकारण उद्योग विश्वात तो फार मोठा होवो अशा शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, सौ. वेदिका परब, प्रभाकर परब,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, महीला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,भाजपा उपाध्यक्ष संजू परब, प्रथमेश तेली, रणजित देसाई, गोवा डिचोली मतदार संघाचे आमदार डाॅ.चंद्रकांत शेट्ये,ॲड.संतोष सुर्यराव,दीपक नारकर, नागेश मोर्ये,समिर नलावडे आदी उपस्थित होते.