विशाल परबांनी घेतले श्री देव उपरलकराचे दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: February 06, 2026 13:31 PM
views 5  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी ३६५ खेड्यांचे अधिपती म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर यांचे गुरुवारी मनोभावे दर्शन घेतले. सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर यांचा वाढदिवस मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती.

दरम्यान, सायंकाळी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी श्री देव उपरलकर चरणी नतमस्तक होऊन कोकणवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. कोकण प्रदेशात शांतता, सलोखा आणि समृद्धी नांदावी, अशीही त्यांनी कामना व्यक्त केली. तसेच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठीही त्यांनी श्री देव उपरलकर चरणी विशेष प्रार्थना केली. लोकशाही प्रक्रियेतून विकासाभिमुख नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री देव उपरलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.