पोलीस बंदोबस्तात मतपेटी केंद्रावर रवाना

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 06, 2026 11:27 AM
views 66  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील 118 मतदान केंद्रावर उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. एकूण 83 हजार 585 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

यासाठी 520 कर्मचारी केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत.  तसेच 10 पोलीस अधिकारी, 144 पोलीस अंमलदार, 289 होमगार्ड या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेत. थोड्याच वेळात मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना होणार आहेत.