निवृत्त शिक्षिका समिधा महाडीक यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 06, 2026 13:35 PM
views 18  views

कणकवली : मूळ नांदगाव व आता कलमठ -गावडेवाडी येथे स्थायीक झालेल्या निवृत्त शिक्षिका समिधा दीपक महाडीक (६६) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दीर, जावा, विवाहित बहिणी, पुतणे, भाचे असा परिवार आहे. देवगड येथील निवृत्त नायब तहसीलदार दीपक महाडीक यांच्या त्या पत्नी, शहरातील आचरा मार्गावरील तंदूर हाऊसचे प्रोप्रायटर तेजस महाडीक यांच्या त्या आई, शशी रगजी यांची मेहुणी, निर्माण डेव्हलपर्सचे रोहन रगजी यांच्या त्या मावशी होत.