विशाल परब रामनवमीनिमित्त उद्या दोडामार्गात

Edited by: लवू परब
Published on: March 25, 2026 21:14 PM
views 15  views

दोडामार्ग :  भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचा गुरुवार, दिनांक २६ मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यादरम्यान ते सर्वप्रथम आयनोडे पुनर्वसन येथील श्री भूतनाथ मंदिरात सायंकाळी ७ वा; खोक्रल येथील श्री शांतादुर्गा देवी मंदिरात ७:३० वाजता व मांगेली देऊळवाडी येथील श्री सातेरी मंदिराच्या वर्धापन दिन कार्यक्रमास रात्री ८ वा. ते उपस्थित राहणार आहेत.