
सावंतवाडी : देवसू पलीकडचीवाडी येथील रहिवासी यशोदा देऊ सावंत यांचे मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशोदा सावंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि शोकाकुल सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनाने देवसू परिसरातील एका ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा आधार हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक तथा दाणोली येथील डॉ. लवू सावंत, भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले ऑर्डिनरी कॅप्टन बाबाजी सावंत आणि दाणोली गावठण प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अनिता शिर्के यांच्या त्या मातोश्री होत.











