
सावंतवाडी : आरोस येथे रामनवमीनिमित्त श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोस यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी रात्रौ १० वाजता ऐतिहासिक नाटक " तो मृत्युंजय एक" (छत्रपती संभाजी) चे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर ,लेखक - महाबळेश्वर रेडकर, रंगमंच अमोल आरोस्कर, वेशभूषा जयंत नाटेकर, प्रकाश योजना युवराज मंगेशकर, पार्श्व संगीत प्रदीप आरोलकर, ध्वनी प्रणाली अविनाश सावंत ,रंगभूषा पुंडलिक परब, संगीत साथ रुपेश पटेकर, गुरुप्रसाद गाडगीळ यांची असून, श्री देव गिरोबा रंगमंच आरोस, गिरोबावाडी येथे या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून या ऐतिहासिक नाटकाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.











