देशाचे भावी नागरिक घडविण्याचे मिलाग्रीस हायस्कूलचे काम कौतुकास्पद : विशाल परब

विशाल परब यांच्याकडून हायस्कूलला लाखों रूपयांची देणगी सुपूर्द
Edited by: भरत केसरकर
Published on: August 15, 2023 12:44 PM
views 168  views

सावंतवाडी : स्वातंत्र्य दिना निमित्त मिलाग्रीस हायस्कुल येथे भाजप युवानेते व उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. ह्या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक रिचर्ड सालढणा,शिक्षकवर्ग, विद्यार्थी,पालक व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना विशाल परब यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व महत्व विषद केले. तसेच विद्यार्थ्यांना संबोधून तरुणाई कशा प्रकारे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. तर भारताचे माजी पंतप्रधान कै.अटबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवभारताच्या प्रगतीच्या संकल्प करावा असे आवाहन परब यांनी केले.तसेच प्रशालेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी लाखों रुपयांची देणगी सुपूर्द केली. यावेळी व्हॉईस प्रिन्सिपॉल सिस्टर नेबल,पर्यवेक्षक मेघना राऊळ व इतर मान्यवर उपस्थित होते.


    भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध मिलाग्रीस हायस्कूलला लाखो रूपयांची देणगी दिली आहे.भविष्यात या हायस्कूल साठी अजूनही आपण मदत करू असे विशाल परब यांनी बोलताना स्पष्ट केल आहे.भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना भारताची पुढील पिढी सक्षम व बलवान होण्यासाठी सर्वानी मिळून एकत्र येवून प्रयत्न करण्याची गरज आहे.देशाचे हे भावि नागरिक असलेल्या या युवा वर्गासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी मी स्वतःहून विशेष प्रयत्न करणार आहे.यासाठी मला केव्हाही हाक मारा हा विशाल परब सदैव तत्पर आहे.ज्या ज्या देशभक्तानी देशासाठी बलिदान दिल त्याच स्मरण करणे हे आपल आद्य कर्तव्य आहे.निश्चितच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश मजबूत व ताकदवान होत असताना आपल्याला मनोमय आनंद होत आहे.आज या स्वातंत्र्यदिन मिलाग्रीज हायस्कूल ने मला बोलवून माझा मानस सन्मान केला तो मला निश्चितच आनंद देणारा आहे.असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.ते मिलाग्रीज हायस्कूल येथे ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते बोलत होते.