
सावंतवाडी: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबईत प्रत्यक्ष भेट घेत त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब रवींद्र चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानतात. त्यामुळे ही भेट केवळ शुभेच्छांची नव्हती तर गुरु-शिष्याच्या जिव्हाळ्याच्या नात्याची अनुभूती देणारी होती.
गुरुंबद्दलची आपुलकी व्यक्त करत विशाल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याच आपुलकीने रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांना पेढा भरवला. गुरु आणि शिष्याच्या नात्यातील विश्वास, स्नेह आणि आदराची भावना हा क्षण सांगून ज
गेला. राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत रवींद्र चव्हाण यांचे स्थान विशाल परब यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली दिशा, काम करण्याची प्रेरणा आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांमध्ये आपल्या राजकीय गुरूंचे योगदान असल्याची भावना विशाल परब यांनी व्यक्त केली.










