
सावंतवाडी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व गुरुकुल मित्र मंडळ यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोकणाचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे गोरगरिबांच्या वेळेला धावणारे एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे उद्गार यावेळी काढण्यात आले. याप्रसंगी बबन साळगावकर यांनी चव्हाण हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती चरणी प्रार्थना केली.
केसरी येथील दुर्गम भागामध्ये त्यांनी के.एस.आर सारखा प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आहे. त्याच्या माध्यमातून आज रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात हा प्रोजेक्ट नॅशनल लेव्हलला नक्कीच पोहचेल असे मत बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक विलास जाधव, मनोज घाटकर संतोष तळवणेकर, दीपक सावंत, बंड्या तोरस्कर, अभय पंडित, दिवाकर भांडये,सचिन माडये गौरव जाधव, ओमकार जाधव, दर्शीद जाधव,रामचंद्र राऊळ, अशोक पेडणेकर, सुनील गावडे, उदय भराडी, सुनील साहिल, तुषार राऊळ,भरत सावंत, संतोष राऊळ,बाळा सावंत,प्रवीण लाखे व रवी जाधव उपस्थित होते.










