आंबेगाव ग्रामस्थांच्यावतीने विशाल परब यांचा सन्मान !

श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिराततील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात
Edited by: भरत केसरकर
Published on: October 17, 2023 14:18 PM
views 117  views

सावंतवाडी : आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात आजपासून सुरु झालेल्या नवरात्र घटस्थापना उत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचा शुभारंभ भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.


  यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री परब यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आंबेगाव गावातील ग्रामस्थांनी माझा केलेला सत्कार लाख मोलाचा असून गावच्या वतीने मला कधीही हाक द्या मी नेहमीच हजर राहीन अशी ग्वाही विशाल परब यांनी दिली. भविष्यात या गावासाठी काहीतरी करायची माझी इच्छा आहे. पुढील कार्यक्रमाचे आयोजन तुम्ही करा मी वेळ देवून उपस्थित राहीन, असे आश्वासन विशाल परब यांनी आंबेगाववासियांना दिले.