सावंतवाडीच्या ग्रामदैवतेच विशाल परबांनी घेतले दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 17, 2025 14:18 PM
views 33  views

सावंतवाडी : सावंतवाडीच ग्रामदैवत चराठा येथील श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या उत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे नेते विशाल परब आणि त्यांच्या पत्नी वेदिका परब यांनी सातेरी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. 

यावेळी वेदिका परब यांनी देवी सातेरीची ओटी भरून मनोभावे प्रार्थना केली. दर्शन घेतल्यानंतर विशाल परब यांनी उत्सवात सहभागी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांनीही त्यांचे मनापासून स्वागत केले. आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करणारे हे उत्सव आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम करतात. सातेरी देवीच्या चरणी प्रार्थना आहे की, सर्व ग्रामस्थांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना विशाल परब यांनी केली.यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.