
सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे जिल्हा स्तरावरील ज्ञानदीप पुरस्कार २०२५ गुरूवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उद्घाटक गजानन नाईक, प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील,सीए लक्ष्मण नाईक, अभिमन्यू लोंढे, सौ.संप्रवी कशाळीकर, विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी कु.स्नेहा विठ्ठल कदम, माणगाव, सौ.शुभेच्छा सावंत बांदा, मंदार चोरगे वैभववाडी, सचिन वंजारी कणकवली, राजाराम फर्जंद दोडामार्ग, शैलेश तांबे वेंगुर्ला, रोहन पाटील दाणोली -सावंतवाडी, राजेश कदम देवगड, कांचन उपरकर सावंतवाडी, अविनाश म्हापणकर सावंतवाडी यांना गौरव पत्र, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
सलग एकोणीस वर्षे सातत्याने शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा साहित्य सहकार,कला संगीत कृषी क्षेत्रातीलपत्रकारिता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानदीप पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख,एस आर मांगले, निलेश पारकर, प्रदीप सावंत, विनायक गावस यांनी केले आहे. हे पुरस्कार सौ रेश्मा भाईडकर, व्ही टी देवण यांनी पुरस्कृत केलेत.











