आमची मुलगी आम्हाला परत द्या...कासार्डेवासीय भावूक

ग्रामस्थांनी वाहिली श्रद्धांजली
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 17, 2025 14:15 PM
views 563  views

कणकवली : युवतीच्या मृत्यूनंतर कासार्डे इथं ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कस्तुरी पताडे हिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी - ग्रामस्थांनी केला.

आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, मृत्यू झालेली मुलगी आम्हाला परत द्या, कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार तयार आहोत. दहा कोटी दिला तरी आम्हाला मुलगी परत मिळणार नाही अशा भावना माजी उपसभापती प्रकाश पारकर यांनी व्यक्त केल्यात. 

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, निवृत्त पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर, माजी सरपंच संतोष पारकर, रविंद्र पाताडे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.