विशाल परब यांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2025 10:37 AM
views 891  views

सावंतवाडी : युवा नेते विशाल परब त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झालेत. श्री. परब यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यात आली असुन पक्षप्रवेशासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.

 भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याबाबत माध्यमाशी संवाद साधताय. श्री. परब यांचे निलंबन मागे घेतले जाणार आहे.  त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याने भाजप भवन परिसरात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. तसेच या प्रवेशामुळे राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे.