युवा नेते विशाल परब यांचे निलंबन मागे

भाजपात होणार भव्य प्रवेश
Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2025 09:56 AM
views 405  views

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे नेते विशाल परब  यांची आज भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. त्यांचं निलंबन मागे घेण्यात आल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. 


दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी तब्बल 35 हजार मतं मिळवली होती. महाविकास आघाडीचा तुलनेत अपक्ष उमेदवाराने 35 हजार मत मिळवण्याचा विक्रम विशाल परब यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी ही घेतल्याने शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येही त्यांना पक्षप्रवेश देण्यासाठी चढाओढ होती. दरम्यान, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. श्री. परब यांची तरुणांमध्ये क्रेझ असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तळकोकणात भाजपला अधीक बळकटी येणार आहे.