
सावंतवाडी : आजची उपस्थिती बघून डोळ्यात अश्रू आले // या ३५ वर्षाच्या तरुणांसाठी आपण आलात मी आपला सदैव ऋणी आहे // या जनतेने दिलेला वेळ मी आयुष्यात विसरणार नाही // माझं पुढचं जीवन या सर्वसामान्य जनतेसाठी असेल // माझे वडील एक शेतकरी लाकूड व्यावसायिक // मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे // मला गरिबीची जाणीव आहे // माझा आर्त हाकेला आपण सर्व माय माऊली जनता एकवटलात // हे सर्व महाराष्ट्रात पोचलं आहे// माझ्या व्यासपीठावर कोण आहे? // गोरगरीब जनता आहे // सर्वसामान्य जनता आहे // माझे स्टार प्रचारक लहान मूल आहेत // या मतदार संघातील प्रत्येक महिलेची आर्त हाक श्री देव पाटेकर ऐकत आहे // हा अभिमन्यू युद्धात उतरला आहे // हा अभिमन्यू चक्रव्यूह नक्की भेदेल // सावंतवाडी मतदार संघात गेली १५ वर्ष मी राहतोय // माझा जन्म इथं झाला // माझा स्वभाव शांतताप्रिय आहे // या मतदार संघात जेव्हा दाहशदवाद येतो तेव्हा हा दहशतवाद ही जनताच घडते // या मतदार संघात विशाल परब एकाच नावाची चर्चा आहे // दुसऱ्या व्यक्तीवर बोलण्यापेक्षा मी काय करू शकतो हे मी सांगणार // या विशाल मुलाला एकदा संधी द्या // पुढे मी या मतदार संघातच राहीन // मुंबईला जाऊन राहणार नाही // या विरोधकांना श्री देव पाटेकर यांना चांगली बुद्धी देवो // मी भाजपला प्रामाणिक मानणारा कार्यकर्ता आहे // या मतदार संघात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे // या मतदार संघातील युवक याचठिकाणी काम करेल यासाठी नवीन प्रकल्प मी आणले आहेत // मी पक्ष बदलला नाही // प्रामाणिक कार्यकर्ता आहे // मी सर्व नेत्यांना मी मानतो त्यांचा आदर करतो // ज्यांनी मला घडवलं त्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मी सलाम करतो // उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला अनेकवेळा फोन आला // जर विशाल परब उभा राहिला नाही तर या मतदार संघात अभद्र घडू शकतो // कोण दुसराच निवडून येऊ शकतो // हा महायुतीचा आक्रोश आहे यामुळे भाजपच्या नेत्यांना सुद्धा शांत राहावं लागतं आहे // या मतदार संघातील जेवढे समाज आहेत ते विशाल परब च्या पाठीशी आहेत // याठिकाणी आलेल्या सर्वांना मी धन्यवाद देतो // जेवढी लोक याठिकाणी आलीत तेवढीच लोक घरी ऑनलाईन बघतात आणि आशीर्वाद देत आहेत //