अखेर ठरलं ; सावंतवाडीतून विशाल परब अपक्ष लढणार

Edited by: संदीप देसाई
Published on: October 24, 2024 08:17 AM
views 640  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रोज नवनवे ट्वीस्ट येतायत. राजन तेलींच बंड करून ठाकरे सेनेत जाणं, अर्चना घारे परबही अपक्ष लढतायत आणि आता तर विशाल परब यांनीही बंड करतायत. त्यामुळे आता आमदारकीसाठी चुरस वाढलीय. विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.    

अखेर सावंतवाडीतून विशाल परब अपक्ष लढणार आहेत. २८ ऑक्टोबरला ते उमेदवारी अर्दाज दाखल करतील. २८ तारखेला सकाळी १० वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, मोती तलावाच्या जवळ ते शक्तीप्रदर्शनही करतील. त्यामुळे आता भाजपमधील किती जण विशाल परब यांच्यासोबत असतील हे पाहावं लागणार आहे. 

सावंतवाडीत विधानसभा मतदासंघात मागच्या काही वर्षात अनेक विकास काम रखडलेली आहेत.  याच गोष्टीचा विचार करुन, येत्या २८ तारखेला सकाळी १० वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान , मोती तलावाच्या जवळ माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला जात आहे.   तुमचा आवाज आणि समर्थन मला यशस्वी बनवू शकते, असं आवाहन त्यांनी केलय.