जय भोसले यांना विशाल परब यांनी दिल्या शुभेच्छा

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
Edited by: विनायक गांवस
Published on: September 23, 2024 10:31 AM
views 246  views

सावंतवाडी : स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जय भोसले यांचे आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

"भ्रष्ट अनितीला करा लक्ष्य... न्याय्य हक्कासाठी व्हा दक्ष" असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ कार्यरत आहे. पत्रकारितेतील नैतिकता जपणाऱ्या संघाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक दबदबा राहिला आहे. जय भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर याच पद्धतीने संघटनेचे कामकाज चालू राहील असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त करत  जय भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.