
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू आहे. दाणोली शाळेत विशाल परब यांच्या माध्यमातून छोट्या विद्यार्थ्यांना आकर्षक असं दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
भविष्यातही पालकांच्या खांद्यावर पडणारा शिक्षणखर्चाचा भार कमी करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी विशाल परब कार्यरत असतील. त्याचप्रमाणे त्यांच्यासारख्या संवेदनशील आणि कष्टकरी लोकांच्या भावनेची जाण असणाऱ्या नेतृत्वाकडून आपल्या शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही असा विश्वास रमेश सुरेश राऊळ यांनी यावेळी व्यक्त केला.