विशाल मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 17, 2024 14:28 PM
views 63  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत आरोग्य सभापती व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसेनेचे नगरसेवक विशाल विकास मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बी. के.एल.वालावलकर रुग्णालय डेरवण,चिपळूण यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर मंगळवार दि.१६ जाने. रोजी स.९ ते दु.२ या वेळात इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड येथे संपन्न झाले.

या शिबिरास देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील संबंधित आजाराच्या ६५ रुग्णांनी लाभ घेतला या शिबिराचे दिपप्रजवलन डॉ सुनील आठवले,तालुका प्रमुख मिलिंद साटम, युवा सेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्या हस्ते तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक बुवा तारी, तेजस मामघाडी, नितीन बांदेकर, संतोष तारी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख पूर्वा सावंत तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकरशहर प्रमुख निकिता जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या निमित्ताने नगरसेवक विशाल मांजरेकर यांचा वाढदिवस केक कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात सर्जन, अस्थिरीगतज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसिन, नाक कान घसा तज्ञ उपस्थित राहणार असून तपासणी दरम्यान रुग्ण आढळल्यास शस्त्रक्रिया करण्यास योग्य पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. 

या शिबिरात हर्निया,पित्ताशयातील खडे,थायरॉईड फायबरोडेनोमा, प्रोटेस्ट ग्रंथी,मूळव्याध, नाकाचा हाड वाढणे, मोतीबिंदू, मुतखडा, चरबी च्या गाठी, स्तनाचा कॅन्सर, टॉन्सिल्स,अल्सर, अपेनडिक्स, कानाच्या पडद्याची तपासणी, तोंडाचा कॅन्सर नाक कान घसा, महिलांची गर्भाशय शस्त्रक्रिया या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात डॉ मंगेश वाघमारे (सर्जरी)डॉ अजय पाटील (मेडीसन)डॉ निहारिका राऊत, डॉ साक्षी चव्हाण (ऑर्थो)डॉ धनंजय शेंडगे, डॉ.तेजस वरपे (ईएनटी),एमएसडब्लू संदीप पाटील, परिचारिका अक्षता शिंदे, दामिनी गमरे, श्रद्धा शिर्के, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला तरी या शीबिराच्या यशस्वी करण्यासाठी महेंद्र भुजबळ, सूरज आचरेकर योगेश गोळम, बाळा कणेरकर, रुपेश साठे, गोट्या डोंगरकर यांच्या विशेष सहकार्यातून हा कार्यक्रम उत्तम रित्या संपन्न झाला.