
सावंतवाडी : श्री शांताराम प्रभू झांट्ये ट्रस्ट (अनुदानित) व रेडकर रिसर्च सेंटर ट्रस्ट संचलित 'विसावा' या नविन संकल्पनेचा शुभारंभ होत आहे. रेडकर हाॅस्पीटल रिसर्च सेंटरच्या १७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उद्योजक, भाजपचे युवा नेते, हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष, विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी व्यासपीठावर मानव साधन शिक्षण संस्थेच्या चेअरमन सौ. उमा प्रभू, गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. विवेक रेडकर, शांताराम प्रभू झांट्ये ट्रस्ट अध्यक्ष सुरेश झांट्ये हे उपस्थित राहणार आहेत.
22 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, रेडी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक, विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी या युवा नेतृत्वाचा सत्कार होणार आहे.