भाजपा पुरस्कृत पॅनलचा झंझावाती प्रचार

मालवण तालूका खरेदी विक्री संघ निवडणूक
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 06, 2022 23:36 PM
views 183  views

मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनेलने रविवारी मालवण शहरात झंझावाती प्रचार केला. सातेरीमांड, रेवतळे, बांगीवाडा, धुरीवाडा, कोळंब येथे घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सहभागी होते. प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यक्त केला. 


मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होत आहे. भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनेलने घरोघर प्रचारावर भर दिला आहे. रविवारी मालवण शहरात सातेरीमांड, रेवतळे, बांगिवाडा, धुरीवाडा येथे प्रचार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबा परब, बबलू राऊत, ललित चव्हाण, राकेश सावंत, राजू बिडये, महेश सारंग, यासह भाजपा पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार संस्था मतदार संघ कृष्णा चव्हाण, राजन गावकर, महेश मांजरेकर, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई. व्यक्ती मतदार संघ : विजय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर. अनुसूचित जाती जमाती : सुरेश चौकेकर. इतर मागास वर्ग : कृष्णा ढोलम. भटक्या विमुक्त जाती जाती : अशोक तोडणकर. महिला जागा : सरोज परब, अमृता सावंत आदी उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावकर, बबलू राऊत, शिवाजी परब, पंकज गावडे, शुभम लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, रमाकांत फाटक, निशय पालेकर, यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


भाजप पुरस्कृत पॅनेलला मालवण शहरासह तालुक्यात सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहता आपला  विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यक्त केला.