
दोडामार्ग : झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघात आज प्रचार करत असताना सर्व मतदारांचा मला चांगला असा प्रतिसाद आहे. सर्वांच्या आशीर्वादानेच मी निवडून येणार असा विश्वास ठाकरे सेनेच्या उमेदवार विनिता घाडी यांनी व्यक्त केला.
झरेबांबर पंचायत समिती मतदार संघात प्रचार करत असताना महिला, जाणकार व युवावर्गाकडून मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. महिला, जाणकारांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर येणाऱ्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी कटीबद्ध राहीन, असा शब्द त्यांनी दिला.










