विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा !

कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे मागणी
Edited by:
Published on: June 21, 2025 19:52 PM
views 438  views

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आक्षेपार्ह विधान आपल्या मुलाखतीत केले. एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. विनायक राऊत यांनी केलेल्या या विधानाचा कुडाळ युवासेनेकडून निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणी विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उप विधानसभा प्रमुख चेतन पडते, युवासेना तालुका सचिव साई दळवी, विश्वास पांगुळ, स्वरूप वाळके, लवू कदम, प्रसन्न्न गंगावणे मुन्ना दळवी, वैभव मेस्त्री, प्रथमेश परब, विनोद सावंत, जागृत परब, भूषण गावडे आदी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.