सिंधुदुर्गात गुंड प्रवृत्तीचे लोक घडविण्याचं काम राणेंनी केले : विनायक राऊत

सिंधुदुर्गात साधा एक सूक्ष्म उद्योगही राणेंनी आणला नाही : वैभव नाईक
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 01, 2024 12:56 PM
views 436  views

कुडाळ :नारायण राणे यांनी सुरुवातीला बाळासाहेबांना त्रास दिला आहे. मंत्री पदावर असताना सत्तेचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत  माजविली. अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीचे लोक घडविण्याचे कामही राणेंनी केले.त्यांचे कार्यकर्ते जनतेसोबत गुंडगिरी करत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठीही राणेंनी  माजविली दहशत लोंकांनी स्वतः बघितली आहे.  आता स्वतःच्या फायद्यासाठी रिफायनरी सारखा  विनाशकारी प्रकल्प  कोकणात उभारण्याचे  काम राणेंना आणि भाजपाला करावयाचे आहे. हा प्रकल्प झाल्यास कोकणची जैवविविधता नष्ट होऊन कोकणवासिय मरणाच्या दारात उभे असतील. त्यामुळे सर्वच बाजूने जनतेला त्रास देणाऱ्या निर्दयी व्यक्तीला आता कोकणातून कायमचे हद्दपार करण्याची हि वेळ आहे. तरच कोकण शांत आणि समृद्ध राहील आणि पुढील पिढीचे भविष्य देखील  उज्ज्वल होईल. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. 


      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया - महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज  घोटगे, जांभवडे आणि आंब्रड येथे खळा बैठक घेतली.यावेळी घोटगे, जांभवडे व आंब्रड वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, गेली चार वर्षे केंद्रीय उद्योग मंत्री असून देखील नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधा एक सूक्ष्म उद्योगही आणला नाही. आजवर राणेंनी आपल्या मंत्री पदाचा फायदा केवळ आपली खाजगी संपत्ती वाढविण्यासाठी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांची मते मागण्याचा अधिकार राणेंना नाही.या निवडणुकीत सिंधुदुर्ग वासियांनीही राणेंना धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले.