
कणकवली : खासदार विनायक राऊत यांनी हरकुळ शेख वाडी येथील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त घरांना तातडीची मदत म्हणून आपण पत्रे व कौले या नुकसानग्रस्त घरांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच प्रशासनासोबत आंबा बागायत व काजू आणि फळझाडे बागायतदारांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन आलेल्या वादळा संदर्भात विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले
यावेळी शिवसेनेचे सतीश सावंत, संदेश पारकर हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल,ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर , माजी सरपंच दिवाकर पारकर, सोसायटी संचालक बाबुल पटेल, आसिफ मुजावर आनंद माडेश्वर समद शेख चांद शेख, बशीर शेख, व ग्रामस्थ उपस्थित होते