थ्रिप्सचं संकट ; देवगडात प्रयोगशाळेची मागणी

खासदारांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 19, 2024 06:03 AM
views 31  views

देवगड : देवगड येथील हापूस आंबा कलमांवर थ्रीप्स रोगाचा झालेला उद्रेक यासाठी देवगड येथे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत देवगड तालुक्याती शेतकरी आंबा बागायतदार यांच्या समस्या जणून घेण्यासाठी व उपाय योजना जाणून घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. या आंब्याला आपण संरक्षण नाही केलं तर लोकांना संरक्षण करू शकणार नाही. असे यावेळी खा.विनायक राऊत यांनी या झालेल्या बैठकीत आपले मत व्यक्त केले.

देवगड स्नेहसंवर्धक सभागृहात आंबा बागायतदारांची बैठक खासदार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी देवगड तालुक्यातील आंबा बागायत्त दारांवर आलेले थ्रीप्सचे संकट हे आंबा बागायतदार यांची आर्थिक हानी करणारे असून स्थानिक बाजारात थ्रीप्स सारख्या रोगावर औषधे उपलब्ध नसतानाही बोगस औषधांची विक्री करून आंबा बागायतदार यांची फसवणूक केली जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून विक्री करण्यात येणाऱ्या कीटकनाशक औषधे यांची तपासणी कृषी विभागाने करावी. तसेच बोगस कीटकनाशके, औषधे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सक्त सूचना खास.विनायक राऊत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या आंबा बागायतदार, शेतकरी, कृषि अधिकारी यांच्या बैठकीत दिली.

तालुक्यातील आंबा बागायतदार यांचेवर थ्रीप्सचे संकट आले असून यावर आवश्यक ती उपाय योजना तसेच समस्या जाणून घेण्यासाठी देवगड तालुका युवसेनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. या बैठकीला खास.विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, तालुका प्रमुख मिलिंद साटम, सचिन सावंत, राजू राठोड, युवा प्रमुख गणेश गावकर फरीद काझी उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, नगरसेवक तेजस मामघाडी, संतोष तारी नितीन बांदेकर, माजी नगरसेवक विकास कोयंडे महिला संघटक सायली घाडीगावकर व अन्य उपस्थित होते.

या बैठकीत कृषी विभागाने गावागावात बागतदारांना कीटकनाशक वापर बाबत माहिती द्यावी.एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबविणे गरजेचे असून १ रु भरून फसल पीक विमा योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करून जे लाभार्थी आद्यपही विमा योजने पासून वंचित आहेत.त्यांच्या नुकसानभरपाई चा पंचनामा करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बागायत दाराना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना केली.

या बैठकीत बागायतदार शेतकरी यांनी फुल कीड,बोगस कीटकनाशक,अवाजवी भरमसाट दराने विक्री, संशोधनाचा अभाव, शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी अधिकारी वर्गाची अकार्यक्षमता या बाबत उहापोह केला. या चर्चेत बागायतदार शरद वाळके, गणेश गावकर, फरीद काझी, इम्रान साटविलकर, सुनील बोडस, माणिक दळवी,राजू वाळके, गणेश वाळके, प्रसाद दुखंडे, श्री परुळेकर जहिर ठाकूर अन्य बागायतदार शेतकरी आदी उपस्थित होते.