अर्चना घारेंकडून विनायक राऊतांचं स्वागत!

प्रचारासाठी कसली घारेंनी कंबर
Edited by: विनायक गावस
Published on: April 20, 2024 14:31 PM
views 99  views

 पक्ष संपलेला, फरक पडत नाही: खा.विनायक राऊत 


सावंतवाडी : इंडिया आघाडीचा विजय निश्चित होईल. सावंतवाडी मतदारसंघातून मोठं मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना मिळवून देऊ. दीपक केसरकर व राजन तेली इथे असले तरी आमचा विजय निश्चित आहे‌ असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. अर्चना घारेंच्या संपर्क कार्यालयात खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले बोलत होते. 


महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी घारेनी खासदार विनायक राऊत यांच स्वागत केल. याप्रसंगी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडीतील नामवंत व्यक्तींच्या गाठीभेटी आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांमध्ये मिसळण्यात होणारा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. यावेळी धनुष्यबाण चिन्ह नाही याचं मला दुःख आहे. भाजपने शिवसेना संपवण्याची जे प्रयत्न केले ते गद्दारांनी पूर्ण केले. पण, आमची मशाल नवा प्रकाश टाकेल असा विश्वास व्यक्त करत मनसे पक्ष संपलेला आहे. त्यांच्या पाठिंब्यान आम्हाला फरक नाही पडत असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. 


दरम्यान, इंडिया आघाडीचा विजय होईल. सावंतवाडी मतदारसंघातून मोठं मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना मिळवून देऊ. दीपक केसरकर व राजन तेली इथे असले तरी आमचा विजय निश्चित आहे‌. विनायक राऊतांविषयीच प्रेम जनतेत आहे. तिसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून येतील असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केला. तर अर्चना घारे-परब म्हणाल्या,विविध मार्गाने दबाव आणूनही आपली पक्षीय निष्ठा न सोडता विनायक राऊत यांनी आपले कार्य मागील दशकभरापासून या भागात उभे केले आहे. मतदारांना आपलासा वाटणारा सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. देशात निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सर्वत्र विविध नेत्यांचा जयघोष सुरू आहे. या तयार केलेल्या फुग्याला आपण भुलायचे की आपण आपल्या कोकणच्या विकासासाठी कटिबध्द रहायचं हे ठरवण्याची खरी गरज आहे. उभ्या महाराष्ट्रात

कोकणी माणसाला त्याच्या स्वाभिमानी स्वभावाला वेगळी ओळख आहे. भविष्यात रत्नागिरी - सिंधुदुर्गचे दिल्लीतील नेतृत्व आणि स्थान बळकट करण्यासाठी एकनिष्ठ, समाजभान जपणारे नेतृत्व विनायक राऊत यांना साथ देऊया. लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात मोठ्या संख्येने भाग घेत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन केलं. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अँड. दिलीप नार्वेकर, अर्चना घारे-परब, अण्णा केसरकर, बाळा गावडे, पुंडलिक दळवी, रुपेश राऊळ, सायली दुभाषी आदि उपस्थित होते.