विनायक राऊतांचा प्रचार बबन साळगावकर करणार !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2024 14:00 PM
views 317  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करणार आहे. तर नुसताच प्रचार करणार नसून राऊत यांना आपल्याला मानणार्‍या मतदारांपैकी १० हजार मते मिळवून देणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.

विनायक राऊत यांनी प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह बबन साळगावकर यांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, अँड. दिलीप नार्वेकर, रूची राऊत, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळा गावडे, शब्बीर मणियार, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सावली पाटकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, हिदायतुल्ला खान आदी महाविकास आघाडीची पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.