बांदा निमजगावाडी येथील विनायक मुरारी सावंत-भोसले यांचे निधन

Edited by: संदीप देसाई
Published on: June 21, 2023 18:50 PM
views 242  views

 बांदा : बांदा निमजगावाडी येथील विनायक मुरारी सावंत-भोसले, वय - ८० यांचे मंगळवारी 20 जुनला रात्री 8 वाजता वृध्दपकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते सेवा निवृत्त पोस्ट मास्तर होते.

     बुधवारी बांदा येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंतीम संस्कार करण्यात आले. सावंतवाडी पंचायत समितीमध्ये स्वच्छता मिशन अभियान अंतर्गत काम करणारे अविनाश सावंत यांचे ते वडील होत. तर सामाजिक कार्यकर्ते भाजपा नेते गुरुनाथ सावंत यांचे ते काका होत. त्यांच्या पछात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, नातवंडे, भाऊ, भावजया, पुतणे असा खूप मोठा परिवार आहे.