साटेली भेडशीतील मठात उद्या विनायक उर्फ अण्णा महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

अण्णा महाराज यांच्या पत्नी श्रीमती संगिता विनायक राऊळ उर्फ बाईमां यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: November 02, 2022 19:49 PM
views 225  views

दोडामार्ग : साटेली भेडशी येथील राऊळ महाराज स्मारक मंदिर वर्धापन दिन तसेच विनायक उर्फ अण्णा महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी ३ नोव्हेंबरला मोठ्या दिमाखात होणार आहे. १ नोव्हेंबर पासून येथे कार्यक्रम सुरू झाले असून उद्या हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे.  त्या निमित्ताने मंदिराला जञेचे स्वरूप आले असून बुधवारी  सकाळी ते राञी उशिरापर्यंत भरगच्च धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी सकाळी काकड आरती करून सुरुवात होणार आहे. मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा जय्यत तयारी झाली असून अनेक वेद शास्त्र ब्राम्हण मंडळी देखील दाखल झाली आहेत. ते आपले धार्मिक कार्य पार पाडत असून गुरुवारी मुख्य कार्यक्रम आहे. सकाळी राऊळ महाराज पादुका अभिषेक सकाळी ८.३६  या शुभ मुहूर्तावर प.पू.विनायक उर्फ अण्णा महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सुवर्णाजी गोपाळ आमोणकर, सौ.स्वाती सुवर्णा आमोणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णा महाराज यांच्या पत्नी श्रीमती संगिता विनायक राऊळ उर्फ बाईमां तसेच समस्त राऊळ भक्त मंडळी यांच्या उपस्थितीत होणार आहे.


दुपारी १२.३० वाजता महाआरती, १ ते राञी १० वाजता अखंड महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी दिड वाजता दत्त संगीत भजनी मंडळ कोल्हापूर यांचे भजन, दुपारी अडीच वाजता सातेरी निरंकारी वनदिंडी कलावन डिचोली गोवा यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता  प.पू‌. राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचा सुनंदा अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी सांज आरती पालखी सोहळा आणि राञी १० वाजता ट्रिकसीनयुक्त अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ' माझे माहेर पंढरपूर'  हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे, तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.