
सावंतवाडी : सोनुर्ली तिठा मळगाव गावात नुकत्याच सुरू झालेल्या श्रीगणेश चोकोबाईटस् चाॅकलेट फॅक्टरीला मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनूमंत पेडणेकर यांनी सदिच्छा भेट देत सौ. ज्योती कोरगावकर, सुरज कोरगावकर, सुनील कोरगावकर यांना शुभेच्छा दिल्या. या फॅक्टरीमुळे पंचक्रोशीतील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील महिला याठिकाणी कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर फॅक्टरीला भेट देत ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनूमंत पेडणेकर, गुरूनाथ गावकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावी, सिद्धेश तेंडूलकर, तुषार वालावलकर, उदय जामदार, गजानन सातार्डेकर, नितीन आशयेकर उपस्थित होते.