सावर्डे विद्यालयात ग्रामस्थ,विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी बनले स्वच्छता दूत

Edited by:
Published on: January 20, 2025 17:35 PM
views 175  views

सावर्डे स्वच्छ शाळा सुंदर शाळा याबरोबरच सुंदर गाव स्वच्छ परिसर यासाठी विद्यार्थी,पालक व शाळेच्या परिसरातील ग्रामस्थांना मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्व पटविणे व घराघरात स्वच्छते विषयक जनजागृती करण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने,  गांधीतीर्थ जळगाव या अभियानांतर्गत वर्षभरात विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्याचं अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. यामध्ये सर्वांना सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक,वैयक्तिक, सामाजिक स्वच्छतेची जाणीव जागृती करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सावर्डे गावचे ग्रामदैवत केदारनाथ मंदिर परिसर स्वच्छ करून सावर्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. प्रत्यक्ष कृतीद्वारे कचऱ्याचे विलगीकरण करून त्याचे व्यवस्थापन करण्याबाबत जाणीव निर्माण करण्याचे काम केले आहे. सावर्डे परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचे व शाळेने राबवलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येकाने आपल्या घर परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली असून त्या दृष्टिकोनातून वेळोवेळी उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी  विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.