
रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख मानसी आंबेकर, युवा सेना तालुका अधिकारी राजेंद्र धावणे, उपतालुका प्रमुख सुजित आंबेकर, विभाग प्रमुख दिनेश पवार यांच्या उपस्थितीत या ग्रामस्थांनी पक्ष प्रवेश केला.
यामध्ये अरविंद अनंत डोळस, दिपाली शामसुंदर खरारे, आदिती अरविंद डोळस, शत्रुघ्न केशव बेर्डे, प्रतिभा परशुराम तळेकर, प्रभावती नारायण कुळ्ये, प्रकाश चंद्रकांत डोळस, संदीप गणपत कदम, विजय तुकाराम वाडेकर, सुयोग विजय जाधव, विनोद चंद्रकांत डोळस, सुरेश विठोबा कुळ्ये, सदानंद विठोबा कुळ्ये, जयराम तळेकर आदी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व ग्रामस्थ किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून आमच्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार या सगळ्या ग्रामस्थांनी केला. या पक्ष प्रवेशा बद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.