कलमठ ग्रामस्थांचे वीज कार्यालयाला टाळे

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 13, 2023 11:15 AM
views 145  views

कणकवली : कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तक्रार देऊन देखील  कोणतीच कारवाई होत नसल्याने, किंवा विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने आता ग्रामस्थांनी  थेट कलमठ ग्रामीण वीज कार्यालयाला टाळे ठोकले आहे. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, महेश लाड, पपू यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, आबा कोरगावकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, तेजस लोकरे, वैभव चिंदरकर, निखिल कुडाळकर, सत्येंद्र जाधव, सचिन वाघेश्री, प्रसाद काकडे, आबा कोरगावकर, रोहित चिंदरकर, नाना गोठणकर, विजू धुत्रे, बंडू दंताळ आदि उपस्थित होते.