शेर्लेतील ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Edited by: विनायक गांवस
Published on: October 02, 2025 20:43 PM
views 57  views

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब परब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शेर्लेतील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश घेण्यात आला.

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील पानोसेवाडी येथील ग्रामस्थ प्रकाश राऊळ, अनिल राऊळ, महादेव राऊळ, मनोहर राऊळ, प्रभाकर राऊळ, अरुण राऊळ, देविदास राऊळ, समीर पोखरे, सागर राऊळ, तुषार राऊळ, पंचशीला जाधव, प्रशांत जाधव, चैताली जाधव यांनी आज शेर्ले सरपंच प्रांजल जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष बबन राणे, तसेच शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते परीक्षित मांजरेकर, शिवसेनेचे तरुण तडफदार शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, तसेच शाखाप्रमुख अनिल पिंगुळकर व बाबा धुरी, समीर पालव यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश केलेल्या तमाम ग्रामस्थांचे शिवसेनेत स्वागत असून त्यांच्या गावातील कोणत्याही समस्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून तात्काळ सोडविल्या जातील. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून, प्रशासकीय स्तरावर सर्व समस्यांना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेर्ले गावाचा विकास जास्तीत जास्त शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल, असे वचन दिले.