लोकसभा निवडणुकीसाठी गावागावात गृह मतदान

Edited by: दिपेश परब
Published on: May 03, 2024 07:27 AM
views 109  views

वेंगुर्ले :  रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जे ८५ वर्षावरील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांग जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी बुधवार १ मे पासून गावागावात गृह मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावात ७ ग्रामस्थ व १ दिव्यांग यांचे गृह मतदान करण्यात आले. या मतदान प्रक्रिया पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वेशन, स्थानिक ग्रामविकास अधिकारी, तलाठी , कर्मचारी , छायाचित्रकार आणि पोलीस यांचा समावेश आहे.  यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशा पद्धतीचे टपाली मतदान बिहार राज्यात घेण्यात आले होते. ज्येष्ठ ग्रामस्थ आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन हे टपाली मतदान घेण्यात येत आहे. ईतर निवडणुकीतील नियमाप्रमाणे आणि गुप्त पद्धतीने हे मतदान घेण्यात येत आहे. 

तालुक्यातील मातोंड गावातील २७०/६९ या केंद्रावरील ८५ वर्षावरील रुक्मिणी गोविंद घाडी, शैलजा लक्ष्मण वैद्य, रुक्मिणी विश्राम मातोंडकर, रुक्मिणी विष्णू रेडकर, हरिश्चंद्र सखाराम वैद्य या ग्रामस्थांचे तर दिव्यांग स्वप्नाली सुधाकर परब यांचे गृह मतदान घेण्यात आले. तर मातोंड २७०/७१ या केंद्रावरील सीताबाई सीताराम कोंडुसकर , प्रभावती सखाराम परब यांचे मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांसाहित मातोंड ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, तलाठी किरण गजनीकर, कोतवाल विश्राम शेटकर, ग्रा प कर्मचारी अरुण रेकडर, दिगंबर मातोंडकर आदी उपस्थित होते.